पंढरपुरातील नदीकाठच्या ३० गावांच्या विकासाला मिळणार गती

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या 30 गवांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युईटी फेज २ अंतर्गत खेडभोसे, देवडे पट कुरोली, आव्हे, नांदोरे, पेहे, बादलकोट, पडस्थळ, सांगवी ते उंबरे पागे, करोडे, कान्हापुरी ते प्रजिमा १३१ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिल्या आहेत.

    अकलूज : आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या 30 गवांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युईटी फेज २ अंतर्गत खेडभोसे, देवडे पट कुरोली, आव्हे, नांदोरे, पेहे, बादलकोट, पडस्थळ, सांगवी ते उंबरे पागे, करोडे, कान्हापुरी ते प्रजिमा १३१ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिल्या आहेत.

    नदीकाठच्या भागातील केळी, द्राक्ष, ऊस, दूध व शेतकरी उत्पादीत इतर मालाला वाहतुकीसाठी रस्त्यांची अत्यंत गरज आहे. या रस्त्याच्या परिसरातील ऊसाची आसपासच्या सात साखर कारखान्याला वाहतूक केली जाते. रस्त्याचा हायब्रीड अ‍ॅन्युईटी फेज २ मध्ये समाविष्ट होण्यासाठी डीपीआर बनवण्याची िवनंती आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

     भीमा नदीला समांतर रस्ता
    सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे, देवडे, पट कुरोली, आव्हे, नांदोरे, पेहे, बादलकोट, पडस्थळ, सांगवी ते रामा ३९५ ते उंबरे (पागे), करोळे, कान्हापुरी ते प्रजिमा १३१ ला मिळणारा रस्ता हा भीमा नदीकाठचा असून नदीला समांतर आहे. भीमा नदीकाठचा परिसर हा काळ्या मातीचा आहे. रस्त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजुच्या ३० गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.