विकासात राजकारण करु नये; शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मुंबईचा आणखी वेगाने विकास होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

मुंबईला आणखी सशक्त करण्याची सरकारची इच्छा आहे.  २०१४ पर्यंत मुंबईत १२ किलो मीटरपर्यंत मेट्रो चालत होती. शिंदे-फडणवीस जोडीनं पुन्हा वेगाने काम सुरु आहे, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकास आणखी होईल, असं मोदींनी विश्वास व्यक्त केला.

    मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची मोठी जय्यत तयारी केली गेली आहे, दरम्यान, सर्व विकासकामांचे मोदींनी लोकार्पण केल्यानंतर आपल्या भाषणात विविध मुद्दांवर भाष्य केले. दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.मुंबईतील सर्व माझ्या बंधू भगिनाना माझा नमस्कार…असं म्हटलं. मुंबईला मेट्रोची गरज आहे, मुंबईला मजबूत बनविण्यासाठी ह्या सर्व विकासकामांची गरज आहे. प्रत्येक मुंबईकरांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारत मोठे स्वप्न बघत आहे. आणि ती स्वप्ने पूर्ण करत आहे, मागील अनेक वर्ष भारताची गरीबीत गेली आहे, स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे, भारताविषयी जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे, तेवढीच विदेशी लोकांना देखील आहे, असं मोदींनी म्हटलं.

    डबल इंजिन सरकार विकास करतेय

    दरम्यान, पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भारताविषयी लोकांमध्ये सकारात्मकता आहे. भारत हे सामर्थ्यशाली देश आहे, भारत वेगाने विकास करत आहे, भारत आत्मविश्साने प्रगतीकडे वाटचाल करतोय, स्वराज व सुराजची भावना देशात आहे. डबल इंजिन सरकार विकास करत आहे. गरीबांच्या जीवांवर काहीनी राजकारण केले, याचे नुकसान करोडो भारतीयांन झाला. आज भारत नव्या विचारांन पुढे जातोय. देशात आज एकिकडे घर, टॉयलेट, वीज, पाणी, मोफत उपचार, शिक्षा, सेवा वैगर या क्षेत्रात वेगाने प्रगती करतोय.

    शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकास आणखी होईल

    दरम्यान, आज जगातील अर्थव्यवस्था डबघईला गेली आहे, पण भारताची मजबूत अवस्था आहे. इनफ्रास्टकरची क्षमता अधिक आहे, देशात ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलंय. आगामी काळात भारत आणखी मोठी झेप घेईल. मुंबईला आणखी सशक्त करण्याची सरकारची इच्छा आहे.  २०१४ पर्यंत मुंबईत १२ किलो मीटरपर्यंत मेट्रो चालत होती. शिंदे-फडणवीस जोडीनं पुन्हा वेगाने काम सुरु आहे, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकास आणखी होईल, असं मोदींनी विश्वास व्यक्त केला.

    मुंबईतील काँक्रेटचे रस्ते हा महत्त्वाचा टप्पा

    आता ३०० कि.मी मेट्रोचे जाळे विस्तारले आहे, आधुनिक सुविधा, स्वच्छता आदी पाहयला मिळतील. बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सी हे एकाच छताखाली आले पाहिजे. गरीब, मोठे मोठे उद्योगपती सर्वांना येथे सुविधी मिळतील. मुंबईच्या आजूबाजूच्या लोकांना पण येथे येणयास भाग पडेल पहिजे. कोस्टल रोड, इंदू मिल, आदी कामाचे काम जोरात सुरु आहे मुंबईतील काँक्रेटचे रस्ते हे महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतोय

    शहरातील विकासांसाठी इच्छाशक्तीची गरज

    मुंबईसारख्या शहरात प्रोजक्टसाठी स्थानिक लोकांची गरज ओळखून प्रकल्प राबिवले जातात, तेव्हाच कामं होतात, मुंबईच्या विकासात स्थानिक लोकांचा महत्वपूर्ण भूमिका असते. तसेच विकासासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, असं मोदींनी म्हटलं.