bhaskar jadhav and devendra fadnavis

राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav And Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल (Mimicry Of Prime Minister Narendra Modi) केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

  राज्याच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav And Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल (Mimicry Of Prime Minister Narendra Modi) केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

  विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. “पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत”, असं राऊत म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिलं.

  “मी आव्हान देतो की नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. या सभागृहात नसणाऱ्यांविषयी बोलायचं नसतं कारण ते उत्तर देण्यासाठी इथे नसतात असा नियम आहे. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढा”, असं फडणवीस म्हणाले.

  दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.

  यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. “२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.

  यावर देवेंद्र फडणवीसांनी लागलीच भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. “पंतप्रधानांची नक्कल या सभागृहात चालणार आहे का? पंतप्रधानांची नक्कल करणं चुकीचं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे लाज”, असं फडणवीस म्हणाले. तसेच, “त्यांनी सभागृहाची माफी मागावी”, असं देखील फडणवीस म्हणाले.

  दरम्यान, यानंतर भास्कर जाधवांनी पुन्हा उभं राहात स्पष्टीकरण दिलं. “मी काय बोललो, ते शांतपणे ऐकून घ्या. मी म्हणालो, २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ते कसे बोलले, ते मी सांगितलं. तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. आता तुम्ही ही चालाखी करत आहेत की पंतप्रधान असं बोलले नाहीत. तुम्ही म्हणताय की ते पंतप्रधान असण्यापूर्वी बोललेत. तसंच मीही सांगतो. ते पंतप्रधान होण्यापूर्वी असं म्हणाले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही, मी एका उमेदवाराची नक्कल केली”, असं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.