
तुम्ही सरकार मध्ये होतात, कोणता निर्णय मागे राहिला असेल तर तो पुर्ण करणं तुमचं काम आहे.
देवेंद्र फडणवीस : आज मराठवाड्यामध्ये कॅबिनेटची जी बैठक पार पडत आहे त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या आधी मंत्रीमंडळाची बैठक संभाजीनगर मध्ये घेतली होती. त्याच्यातील जवळपास सगळे निर्णय एखादं दुसरं राहिल असेल तांत्रिक अडचणीमुळे बाकी सगळे इंप्लीमेंट झाले आहेत. त्याची माहिती देखील आम्ही प्रेस घेऊन देणार आहोत असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे लोक आज म्हणत आहेत मागच्या बैठकीत काय झालं, माझा त्यांना सवाल आहे तुम्ही अडीच वर्षात मराठवाड्यासाठी काय केलं. तुम्ही सरकार मध्ये होतात. कोणता निर्णय मागे राहिला असेल तर तो पुर्ण करणं तुमचं काम आहे. तुम्ही सरकार मध्ये होतात, कोणता निर्णय मागे राहिला असेल तर तो पुर्ण करणं तुमचं काम आहे. तु्म्ही काय केलं, अडीच वर्ष तुम्ही माशा मारत होतात का? मराठवाडा वॅाटर बीडचा मुग्धा पाडण्याचा काम ज्यांनी केलं आता तेच विचारतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठवाड्याला नक्की काय मिळालं, जे दिलं होतं त्याचा मुडदा पाडण्याचं कामं यांनी केलं आणि याना मराठवाड्याशी काही देणं घेणं नाही. यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि मराठवाड्याच्या हिताची बैठक होणार असेल तर कशी हाणून पाडायची, कसे निर्णय होणार नाहीत, कसा मराठवाडा मागेच राहिल अशा प्रकारचा यांचा कावा आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं.