devendra fadanvis in delhi

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis In Delhi) यांनी दिल्ली दौरा केला आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा(J.P. Nadda) यांची भेट घेतली आहे.

    आगामी सहा महिन्यांध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे.तसेच केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असणार आहेत. दरम्यान, या गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis In Delhi) यांनी दिल्ली दौरा केला आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा(J.P. Nadda) यांची भेट घेतली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, “आमचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन घेतले. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील पाऊस आणि पूरस्थिती याची तपशीलवार माहिती सुद्धा त्यांनी यावेळी घेतली. गोव्याचे मंत्री मायकेल लोबो यावेळी उपस्थित होते.”

    तसेच, “गोवा विधानसभा निवडणुकीबाबत आमचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले.” असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. या ट्विटसोबत भेटीचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.


    दरम्यान, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे.