देवेंद्र फडणवीस यांना कधीही अटक होऊ शकली असती, चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काळ मंगळवेढ्यात सभेचे आयोजन केले होते.

    मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काळ मंगळवेढ्यात सभेचे आयोजन केले होते.या सभेला पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही अनेक मतभेद मतदासंघांमध्ये सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. ३३ महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

    चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापूर निवडणूक कठीण नाही, माढ्याची निवडणूक कठीण नाही ती कठीण केली. ईश्वराला सगळ्यांची काळजी आहे. तो त्याचे संतुलन बरोबर करत असतो. मी राज्याचा अध्यक्ष होतो तेव्हा ३३ महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे. पण मला याची खात्री आहे हे ही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. त्यामुळे चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

    देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते

    देवेंद्र फडणवीस यांना मी राज्याचा अध्यक्ष असताना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती. ३३ महिने आम्ही जे सहन केलं आहे. आम्हाला माहित आहे कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती. पण मला खात्री होती हे ही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. महविकास आघाडीच्या सत्तेच्या वेळी अशी वेळ आली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या बैठकीच्या वेळी म्हणाले, सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही मात्र माढ्याची निवडणूक कठीण नव्हती ती कठीण केली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.