Power should not go to the head; Devendra Fadnavis warns Mahavikas Aghadi government on Kangana and Arnab issue

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार राज्यसभेवर निवडून आले. शिवसेनेचे संजय पवार यांचा धनंजय महाडीक यांनी पराभव केला, आणि हा विजय भाजपच्या नावे कोरला गेला. या विजयाचे श्रेय सर्वजण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे असल्याचे म्हंटले आहे.

    पिंपरी : शुक्रवारी राज्यसभा निवडणूक (rajya sabha election result) पार पडल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याचा निकाल आज रात्री तीन वाजता लागला. राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ९ तासांच्या नाट्यमय घडामोंडीनंतर आज पहाटे तीन वाजत निकाला आहे. आणि शिवसेनेच संजय पवार यांनी हरवत भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. यानंतर पवार यांनी ३९ मते मिळाली तर, महाडिक यांना ४१ मते मिळाली. या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात सहा जागांपैकी तीन जागा भाजपाला मिळाल्यात तर, तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. दरम्यान निकालानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार राज्यसभेवर निवडून आले. शिवसेनेचे संजय पवार यांचा धनंजय महाडीक यांनी पराभव केला, आणि हा विजय भाजपच्या नावे कोरला गेला. या विजयाचे श्रेय सर्वजण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे असल्याचे म्हंटले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी आहेत. आपल्या मतदानाचा आणि पक्षनिष्ठतेचा हक्क बजावण्यासाठी दोघांनीही थेट रुग्णवाहिनेतून आणण्यात आलं होतं. त्यांच्या या हिंमतीला दाद देत भाजपने हा विजय त्यांच्या नावे घोषित केला आहे. भाजप असो वा महाविकास आघाडी असो प्रत्येक पक्षाला आपल्या आमदारांचे एक एक मत महत्त्वाचे होते. ही लढाई प्रतिष्ठेची होती. या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांनी महाविकास आघाडी न फोडता अपक्षांना आपल्या बाजूने करत हा विजय आपलासा केला.