देवेंद्र फडणवीस भाजपमधील एक- एक ओबीसी नेतृत्व संपवत आहेत; सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मला वनवास भोगावा लागला, संघर्ष करावा लागला, असे वक्तव्य केले. याबाबत सुषमा अंधारे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे.

    बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मला वनवास भोगावा लागला, संघर्ष करावा लागला, असे वक्तव्य केले. याबाबत सुषमा अंधारे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस भाजपमधील एक – एक ओबीसी नेतृत्व संपवत आहेत. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजप महाराष्ट्रात उभी केली. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या लेकीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही वेळ आणली आहे. एवढेच नाही तर त्याच पक्षातील ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबत हेच झाले आहे, हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीस भाजपातील नेतृत्व संपवण्यास जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमध्ये केला आहे.

    काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काही फरक पडत नाही. शायनिंग इंडिया आणि फील गुड या दोन्ही कॅमम्पियन कुठलीही गोष्ट एक ठराविक लिमिटपर्यंत चांगले वाटते. भाजपाचा अतिरेक झालेला आहे. निवडणुकांमध्ये भाजपला बॅक फायर होणारं आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

    ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांवरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. तर मंत्र्यांना देखील संरक्षण देण्यात फडणवीस असमर्थ ठरले आहेत. असं भुजबळ यांना आलेल्या धमकी पत्रावरून सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडले.

    यावेळी त्या म्हणाल्या, की एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे मराठा समाजाची दिशा भूल केली? हे सर्व राज्याला माहित आहे. सूचना म्हणजे अध्यादेश नसतो, अध्यादेश काढण्यासाठी हरकती मागवले आहेत. 16 तारखेनंतर याविषयी साधक बादक चर्चा होईल, त्यानंतर आचारसंहिता येईल. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी केवळ धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.