उद्धव ठाकरेंच्या सगळ्या भानगडी देवेंद्र फडणवीसांना माहित आहेत, एकनाथ शिंदेंच्या दाव्याने एकच खळबळ; म्हणाले…

कोविडकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. तपासात अडचणीत येऊनच आरोप केले जात आहेत. ईडी हा तपास करत आहे, त्यामुळे ते घाबरले आहेत. तुमचं काही चुकलंच नाही, मग घाबरायचं कशाला. तुम्ही स्वच्छ आहात तर चौकशीली सामोरी जा, असं शिंदे म्हणाले.

    मुंबई – महाराष्ट्रात फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे (Thackeray vs Fadnavis) असा संघर्ष पेटला आहे. हे प्रकरण कुटुंबापर्यंत पोहोचल्यानंतर राजकारण आणि वातावरण देखील तापले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंची सर्व कागदपत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मराठा मंदिर (Maratha Mandir) संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात झालेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. शिंदेंच्या या मोठ्या दाव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

    समजने वालोंको इशारा काफी है…
    ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडून सरकारवर बेताल आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांच्याच विरोधात बोलले जात आहे, स्तरहीन भाषा वापरली जात आहे. हे राज्यातील जनता पाहत आहे. फडणवीस कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप चॅट आणि पीएम केअर फंडाच्या चौकशीची मागणी लावून धरत उद्धव ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात फडणवीस-मोदींवर निशाणा साधला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत होते. ते म्हणाले की, मी फडणवीसांसोबत काम केले आहे, मलाही अनेक गोष्टी माहित आहेत. मीही अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. त्याबद्दल फार काही बोलायचे नाही. ज्यांना हे समजते त्यांच्यासाठी एक इशारा पुरेसा आहे. असा शिंदेंना ठाकरेंना इशारा दिला आहे.

    मग घाबरायचं कशाला…

    कोविडकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. तपासात अडचणीत येऊनच आरोप केले जात आहेत. ईडी हा तपास करत आहे, त्यामुळे ते घाबरले आहेत. तुमचं काही चुकलंच नाही, मग घाबरायचं कशाला. तुम्ही स्वच्छ आहात तर चौकशीली सामोरी जा, असं शिंदे म्हणाले. हा बाळासाहेबांचे पुण्य आहे, नाहीतर…! शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना यापूर्वी आणि अलीकडे अनेकदा मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदत केली आहे. याचे भान उद्धव यांनी ठेवावे. त्यांच्यावर आरोप करणे ही उद्धव यांची कृतघ्नता आहे. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.