लवकरच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार :  आमदार शिवेंद्रसिंहराजे 

महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार. त्याच्या हलचाली कालच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर  सुरू झाल्या आहेत असे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी मंगळवारी सुरुची बंगला येथे माध्यमांशी बाेलताना नमूद केले.  

    सातारा : महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार. त्याच्या हलचाली कालच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर  सुरू झाल्या आहेत असे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी मंगळवारी सुरुची बंगला येथे माध्यमांशी बाेलताना नमूद केले.
    विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी सकाळपासून महाराष्ट्रातील राजकारणात विशेषत: शिवसेनेत काही घडामाेडी घडल्या आहेत. शिवसेनेच्या  काही आमदारांचे फाेन लागत नसल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेचे आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे १७ आमदारांचे माेबाईल फाेन नाॅटरिचेबल झाल्याने राज्यात राजकीय भुंकप घडणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

    दरम्यान,  राज्यसभा निवडणुकीपुर्वी संभाजीराजेंची गेम झाली मी एवढेच म्हटले हाेते. मी काेणाचे नाव देखील घेतले नव्हते. त्यानंतर खासदार संजय राऊत  यांनी ते मनाला का लावून घेतले काय माहिती. ते खासदार आहेत. त्यांचे किंवा काेणत्या पक्षाचे नाव घेतले नव्हते असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

    – मध्यावधी निवडणुकांबाबत सांगू शकत नाही
    महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येईल. त्याच्या हालचाली कालच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर सुरू झाल्या आहेत असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले विकासकामांच्या दृष्टीने आमदार व मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्याशी माझी नेहमी भेट हाेत असती. राज्यात मध्यावधी निवडणुक हाेतील का नाही हे आत्ता सांगू शकत नाही असेही राजेंनी नमूद केले.