devendra fadnavis in gadchiroli

    नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही.पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला. अशी टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    न्यायालयाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे. योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कारवाई करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देणंसोडत नाही . हे सरकारचे फेल्यूअर आहे. २ वर्ष सरकारने टाइमपास केला.