देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर- लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो; उद्धव ठाकरेंचा टोला

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, असं ठाकरे म्हणाले.

    मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी. असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. मी खर्च तयार करायला तयार आहे. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.

    केजरीवालांना अटक करणं म्हणजे हुकूमशाही

    अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते. देशात जी हुकूमशाही आली आहे त्या विरोधात एक होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितल होते.हेमंत सोरेन, केजरीवालांना अटक करणं म्हणजे हुकूमशाही आली आहे. केसेस टाकून अटकेत टाकलं जाते. ही लोकशाही नाही, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.