The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू कल्पक नेतृत्वामुळे भाजपला मोठा विजय मिळाला असून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या 3 जागा जिंकून आणल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.

    मुंबई : शुक्रवारी राज्यसभा निवडणूक (rajya sabha election result) पार पडल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ९ तासांच्या नाट्यमय घडामोंडीनंतर आज पहाटे तीन वाजत निकाला आहे. आणि शिवसेनेच संजय पवार यांनी हरवत भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. यानंतर पवार यांनी ३९ मते मिळाली तर, महाडिक यांना ४१ मते मिळाली. या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवलेंनी सुद्धा या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू कल्पक नेतृत्वामुळे भाजपला मोठा विजय मिळाला असून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या 3 जागा जिंकून आणल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.

    दरम्यान, भाजपचे राज्यसभा उमेदवार केंद्रीयमंत्री पियूष गोयल, अनिल बॉंडे, धनंजय महाडिक या विजयी उमेदवारांचे रामदास आठवले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धोबीपछाड देत कौशल्याने भाजपची तिसरी जागा जिंकून आणली आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. “निवडणूक कशी जिंकायची ती शिकविली आहे. तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे”. अशी कविता सादर करून रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.