Currently there is no such thing as a lockout, the government should consider the opposition as well; Appeal of Devendra Fadnavis

आपल्याला दोन वर्षांत बदल करून दाखवायचा आहे. चांगल्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. शहरीकरणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मिती होईल,असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

    मुंबई: विकासाच्या मार्गात कुणालाही अडथळा आणू देणार नाही. टक्केवारीकरिता प्रकल्प अडकवून ठेवणे हे खपवून घेतलं जाणार नाही. यामध्ये कुणीही असलं तरी… लोकप्रतिनिधी असतील,तर मुख्यमंत्र्यांना सांगा. अधिकारी असतील, तर लोकप्रतिनिधींना सांगा. पण हे सगळे धंदे यातले बंद झाले पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खडसावलं आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या (Swachcha Maharashtra Abhiyan)दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

    फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला दोन वर्षांत बदल करून दाखवायचा आहे. चांगल्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. शहरीकरणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मिती होईल. नवनवीन तंत्रज्ञान समोर येईल. चांगल्या स्टार्टअपला काम देण्याचा विचार केला पाहिजे.

    ते पुढे म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र दोनचा शुभारंभ आपण करतो आहोत. जबाबदारी असलेल्यांच्या उपस्थितीत हे अभियान राबवितोय. विकासाच्या वाटेवर शहरीकरण वेगानं होत आहे. शहरीकरण थांबवू शकलो नाही. ते सुनियोजित करण्यासाठी धोरणांअभावी शहरं बकाल झाली. पाणी, कचरा, सांडपाणी अशा समस्या निर्माण झाल्या.

    स्वच्छ महाराष्ट्रच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शहरे येणार आहेत. पुढच्या दोन-तीन वर्षांत संपूर्ण शहर बदलविता येणार आहेत. छोट्या शहरांचा फरफॉर्मन्स चांगला आहे. एकूण ५१२ शहरांमध्ये निधीची कमतरता नाही. परिवर्तनासाठी नवीन पद्धती आणाव्या लागतात. नवीन बिझनेस प्राक्टिसेस कराव्या लागतात. जनतेला विश्वासात घ्यावं लागतं. लोकसहभागामुळं हे शक्य झालं, असं फडणवीस यांनी सांगितलं.