MPSC च्या अभ्यासक्रमात बदलाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले…

राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात.त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी आमची राज्य सरकार आणि आयोगाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

    पुणे- अजून तरी असा अभ्यासक्रम तयार केलेला नाही तशी शिफारस आलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात दळवी कमीटीने ही शिफारस दिलेली आहे. मात्र कधीतरी आपल्याला UPSC च्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. या विद्यार्थ्यांची मागणी आहे की २०२५ नंतर हा अभ्यासक्रम लागू करावा, त्यानंतर येणारे म्हणतील २०२७ ला लागू करा मात्र धीनाकधी तो लागू करावाच लागेल. सरकार सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले.

    काय आहे विद्यार्थ्यांचे आंदोलन
    राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात.त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी आमची राज्य सरकार आणि आयोगाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही अलका टॉकीज चौकात जाणार नाही, असा इशारा राज्य सरकारला काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे यांनी दिला.