काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात असते तर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळबाबत भाष्य केलं.

    मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी माथाडी कामगारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात असते, तर जवळपास दोन ते अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते. असा टोला त्यांनी लगावला.

    माथाडी कामगारांच्या मेळाव्यात फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळबाबत भाष्य केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात असते, तर जवळपास दोन ते अडीच लाख मराठा तरूण उद्योजक झाले असते. असं त्यांनी म्हण्टलं. तर, आम्ही मंडळ जिवंत करून मराठा समाजाला न्याय दिल्याचही ते म्हणाले.