3 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? राजकीय घडामोडींना वेग

विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. ज्या दिवशी शिंदे आमदारांसह सूरतेत गेले असे स्पष्ट झाले त्याच दिवशी पहाटे फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. या दोघांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमीत शहा यांच्याशी चर्चा बैठका झाल्या आणि रात्री उशिरा फडणवीस मुंबईत परतले. तेव्हापासून स्वपक्षीय आणि नंतर अन्य लहान पक्षांच्या आमदारांबरोबर संपर्क सुरु आहे. भाजप 3 जुलै रोजी शपथविधी करण्याची तयारी करत असल्याच्या हालचाली सुरु आहेत(Devendra Fadnavis to be sworn in as Chief Minister on July 3).

    गिरीश महाजन, आशीष शेलार असे सहकारी सारखे सागर बाहेर लगबग करत होते. प्रवीण दरेकर यांच्या समवेत मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या सागरवर येऊन फडणवीसांशी चर्चा करून गेल्या. पाठोपाठ बहुजन विकास आघाडीचे तरूण नेते आमदार क्षितीज ठाकूरही सागरवर येऊन गेले.

    गुरुवारी सकाळपासून सागरवर बैठकींचे सत्र सुरु आहे. आता भजापाच्या गोटातून असे सांगण्यात येते आहे की शिंदेंच्या गटाकडे दोन तृतियांश पेक्षा अधिक आमदार जमा झाले आहेत. आता पुढच्या दोन दिवसात मोठ्या वेगाने घटना घडतील आणि सारे सुरळीत झाले तर येत्या 3 जुलै रोजी देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतील. मात्र या वेळेचा शपथविधी हा पहाटे होणार नाही तर जाहीर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जाईल.