
देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना सेंट्रल व्हिस्टा का उभारलं गेलं आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. नवी संसद गरज नसताना उभारली आता तिथे राष्ट्रपतींना बोलवण्यात आलेलं नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तो अधिकार आहे.
मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना भाजपा, (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्र सरकारवर सडकून टिका केली. २८ मे रोजी नव्या संसद भवनाचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे. एका आदिवासी राष्ट्रपती महिलेला डावललं आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद बळकट आहे. तरीही या सरकारने नवी संसद उभारली. आणि राष्ट्रपतींना उद्घनापासून का डावललं आहे? नावाच्या पाट्या लावण्यासाठी नवी संसद उभारली आहे का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर व मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अर्थव्यवस्था कमकुवत असताना…
लोकशाहीच्या बाता कसल्या मारता?
राष्ट्रपती भवनाच्या समोर नवं संसद भवन आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण नाही. देशाचे संविधानिक पद आहे, त्यांना निमंत्रण नाही, तर आमच्यासारख्याची काय गत आहे. मोदी ऑस्ट्रेलियात लोकशाहीच्या बाता मारताहेत, मात्र आपल्या देशीत लोकशाही जिंवत आहे का, ही नेमकी कुठली लोकशाही आहे? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.