भाजपप्रणित सोलापूर जिल्हा परिषद केंद्र सरकारात नापास; देवेंद्र फडणवीस घेणार आमदारांचा आढावा

भाजपप्रणित सोलापूर जिल्हा परिषद केंद्र सरकारच्या शासकीय नियमात नापास झाली असल्याने भाजप आमदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहे.

  सोलापूर : भाजपप्रणित सोलापूर जिल्हा परिषद केंद्र सरकारच्या शासकीय नियमात नापास झाली असल्याने भाजप आमदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. याचदरम्यान ते शहर जिल्हयातील आमदारांचा आढावा घेणार आहेत.

  केंद्र शासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. देशपातळीवरील गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्वोत्कृष्ट ठरल्याने पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाच्या कामकाजात कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दबदबा वाढला आहे.

  २०२०-२१ या वर्षातील कामकाजावर आधारित ही पुरस्कार योजना होती. यासाठी जिल्हा परिषदेने. केंद्रस्तरावर ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर २७ आणि २८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद आणि आजरा तालुक्यातील शृंगारवाड़ी ग्रामपंचायतीची दप्तरीय व क्षेत्रीय आठ एप्रिलला या स्पर्धेचे निकाल दिल्लीतून जाहीर करण्यात आले.

  कोल्हापूर जिल्हा परिषद ५० लाख रुपयांच्या राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेनी गौरव करण्यात आले आहे. या निकषांवर कोल्हापूर जिल्हा परिषद ठरली अव्वल

  जि.प.च्या सर्वसाधारण सभा व विषय समिती सभांचे आयोजन व कामकाज, त्यामध्ये पुरुष, महिला, सदस्यांचा सहभाग, विभागांचे वार्षिक अंदाजपत्रक व आराखडा व त्यातील समाजघटकांचा सहभाग, केंद्राकडील विविध योजनांचा प्राप्त व झालेला खर्च, स्वनिधीचा खर्च, स्वउत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, मागासवर्गीयांसाठीच्या योजना व खर्च, महिलांच्या उपजीविकेकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, महिला व बालकांसाठी घेण्यात आलेली आरोग्य शिबिरे यांचीही दखल घेण्यात आली.

  लेखाविषयक कामकाज व जतन केलेले अभिलेख, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव, बायोगॅस उभारणी, कामधेनू योजना, कोविडमधील कामकाज, कुपोषण कमी करण्यासाठी राबविलेले उपक्रम, नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण, बचत गटांनी ॲमेझॉन आणि फिल्पकॉर्ट ऑनलाईन बाजारपेठांमध्ये वस्तू विक्रीसाठी केलेले प्रयत्न, याचीही दखल घेण्यात आली.