काँग्रेसच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मनी डॉड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसकडूनही आंदोलन सुरु आहे. काँग्रेसने राजभवन समोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रीया दिली.

    मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मनी डॉड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसकडूनही आंदोलन सुरु आहे. काँग्रेसने राजभवन समोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रीया दिली.

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

    काँग्रेसचे हे आंदोलन चुकीचे आहे, उच्च न्यायलयाच्या आदेशनंतर राहुल गांधी यांची ईडी चौकशी करत आहे. त्यामुळे अशा प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे, उच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे आहे. असं फडणवीस म्हणाले.

    शरद पवार यांच्या राष्ट्रपती उमेदवारीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एनडीए जवळ पुरेशे संख्याबळ आहे, त्यामुळे एनडीए सांगेल ते उमेदवार राष्ट्रपती होतील, असंही फडणवीस म्हणाले, अग्निपथ योजनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, अग्निपत हे अॅडीशनल आहे, त्यामुळे रेग्युलर भरती बंद होणार नाही, काही जणांचा गैरसमज झाला आहे, पण त्यांच्या आता क्षातक आल्यानंतर ते विरोध करणार नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    दरम्यान भाजपच्या केंद्रीय मंडळाने लोकसभेच्या राज्यातील काही जागांवर लक्ष घातले आहे. त्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजच्या बैठकीत या संबंधी चर्चा झाली. ज्या जागा आम्ही जिंकल्या आहेत त्यावर आमचे लक्ष आहे, नव्याने जिंकायच्या आहेत त्यावर आता आम्ही लक्ष देणार आहे. आम्ही यावेळी ४८ मतदार संघात तयारी करणार आहे. असंही ते म्हणाले.