भाविकांच्या वाहनाला पंढरपूरजवळ अपघात ; एक ठार तर एकोणीस जखमी,  दर्शनासाठी जाताना घडली दुर्घटना

पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनास अपघात झाला. या अपघातात एका भाविकांचा मृत्यू झाला, तर १९ भाविक जखमी झाले. पिकअपमधून परभणी जिल्ह्यातील बाला तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. भाविकांनी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानंतर पिकपमधून सर्व भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे निघाले होते.

    पंढरपूर :  पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनास अपघात झाला. या अपघातात एका भाविकांचा मृत्यू झाला, तर १९ भाविक जखमी झाले. पिकअपमधून परभणी जिल्ह्यातील बाला तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. भाविकांनी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानंतर पिकपमधून सर्व भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूरजवळ आले असतानाच तुंगत गावाजवळ पिकअप पलटी झाली.

    वेगातील वाहन उलटल्याने गाडीतील भाविकांची तारांबळ उडाली. या वाहनातून एकूण २० जण प्रवास करीत होते. अपघातात चिमाजी टेंभुले (वय ४५) या भाविकाचा मृत्यू झाला, तर १९ भाविक जखमी झाले. जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले. काही वेळात पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले.  जखमी झालेले भाविक घाबरून गेले होते.

    क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक
    भाविकांच्या वाहनाला अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खासगी वाहनाने क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवून वाहतूक केली जाते. दूर अंतरावरून सलग प्रवास केला जात असतो. त्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण राहत नाही.