धाराशिवला आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’; शेळ्यामेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

धनगर समाजाची एसटी आरक्षणाची (ST Reservation) अंमलबजावणी करावी व प्रमाणपत्राचे वाटप तात्काळ सुरू करण्यात यावे; यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. हीच मागणी घेऊन हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला.

    धाराशिव : धनगर समाजाची एसटी आरक्षणाची (ST Reservation) अंमलबजावणी करावी व प्रमाणपत्राचे वाटप तात्काळ सुरू करण्यात यावे; यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. हीच मागणी घेऊन हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला.

    धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून अद्याप निर्णय होत नसल्याने धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. धाराशिवच्या लेडिज क्लबच्या मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

    चाकजाम करत घोषणाबाजी

    येळकोट येळकोट जय मल्हार.. सह आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत जिल्हाभरातुन हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधवांनी चक्का जाम करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमलबजावणी करावी: अशी मागणी समाजबांधवांनी केली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.