धंनजय मुंडेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध; करुणा मुंडेंचे गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी पत्रपरिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे हे 10 मोबाईल क्रमांक वापरतात, त्यांचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध आहेत असे त्या म्हणाल्या(Dhananjay Munde's immoral relations with many women; Serious allegations by Karuna Munde).

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी पत्रपरिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे हे 10 मोबाईल क्रमांक वापरतात, त्यांचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध आहेत असे त्या म्हणाल्या( Dhananjay Munde’s immoral relations with many women Serious allegations by Karuna Munde ).

  मी त्यांची पहिली पत्नी आहे तरीही धंनजय मुंडे यांनी न्यायालयात आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये राहत होतो असे सांगितले, 4 मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर सोडून दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

  राज्यात शक्ती कायदा मंजूर झाला आहे, पण सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरुन महिलांवर अत्याचार होत आहेत. धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा गैरवापर करत असून खोट्या तक्रारी दाखल करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहेत. त्यांची इज्जत करत होते म्हणून आजपर्यंत तोंड उघडले नाही असे करुणा मुंडे म्हणाल्या.

  धंनजय मुंडे जमीन बळकावतात, निधन झोलेल्या व्यक्तीने यांच्या नावे जमीन केल्याची कागदपत्रे दाखवतात पण ती सगळ खोटी आहेत. महाविकास आघाडी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे, सरकार शक्ती कायदा का पाळत नाही असा सवाल करुणा शर्मा यांनी उपस्थित केला.

  माझी बहिण रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे देखील संबंध होते. याचे पुरावे रेणू शर्मा देणार होती, पण ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणूचा मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी, त्यात सत्य समोर येईल असे करुणा शर्मा म्हणाल्या.

  धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात टाकले. बहिणीला धंनजय मुंडे एका व्यक्तीच्या द्वारे पैसे पाठवत आहेत ते का पाठवत आहेत ? असा सवाल करुणा शर्मा यांनी उपस्थित केला.

  धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच 2008 मध्ये माझ्या आईने आत्महत्या केल्याचा आरोपही करुणा यांनी केला. तर भावाला खूप त्रास दिल्याने त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले. करुणा शर्मा मुलगी शिवानीला सोबत घेऊन पत्रपरिषद घेणार होत्या. पण ऐनवेळी मुलगी पत्रपरिषदेस गैरहजर राहिली. शिवानी ही मुंडे यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट करणार होती. मात्र, तिला धमकावल्याने ती गैरहजर राहिल्याचे शर्मा यांनी सांगितले.

  शरद पवारांनी मुंडेंना मंत्रिपदावरून हाकलले पाहिजे असही त्या म्हणाल्या. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे आज का बोलत नाहीत. सुप्रिया सुळे यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

  धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहे. मी मुंडेवरील बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे. तसेच आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी केली असल्याचेही करुणा शर्मा यांनी सांगितले.