dharavi slum fire update finally under control more than 100 houses gutted After about eight hours of tireless efforts the fire brigade succeeded nrvb

धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फिट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीने रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फिट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) शाहूनगर (Shahunagar) परिसरातील कमला नगरच्या (Kamla Nagar) झोपडपट्टीमध्ये (Slum Area) पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये १०० पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली आहेत. अथक प्रयत्नानंतर अखेर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण (Mumbai Firebrigade Control On The Fire) मिळवण्यात यश आले असून, पहाटे ४ च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या झोपडपट्टीत कपडे, कागद मोठया प्रमाणात जळून खाक झाले आहे. सुमारे आठ तासाच्या (After 8 Hours) अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले

अत्यंत अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने असलेल्या झोपड्या, त्यातील ज्वलनशील वस्तू यामुळे ही आग पसरली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पहाटेच्या वेळी लोक झोपेत असताना ही भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरू झाले.

या झोपड्यांमध्ये धारावीत विविध व्यवसाय चालतात. दोन, तीन मजली झोपड्यांमध्ये कापड शिलाई, बॅग बनवणे असे व्यवसाय चालत असल्यामुळे झोपड्या तसेच गोदामातील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काही काळाने अग्निशमन दलाकडून आणखी काही गाड्या घटनास्थळी मागवण्यात आल्या आणि त्यामुळे २० ते २५ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करीत होत्या.

अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत नव्हते अग्निशमन दलाचे जवान पत्र्यावर चढून पाण्याचे फवारे मारत होते त्यासोबत नव्याने दाखल झालेल्या तीन एरियल वॉटर व्हेईकल देखील या ठिकाणी मागवण्यात आल्या मात्र अरुंद रस्त्यामुळे त्यांना देखील आज जाण्यास मार्ग मिळत नव्हता अखेर त्यातील एका व्हेईकल चा वापर करत लांबून व उंचावरून या वाहनामार्फत पाणी मारण्यास सुरुवात झाली या वाहनातून लांबवर पाणी मारले जात असल्याने जवान लांबच राहून देखील फायर फायटिंग करू शकतो अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी दिली

आगीमुळे वाहतुकीमध्ये बदल

धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फिट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीने रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फिट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

बहु मजली झोपड्या आणि अरुंद रस्त्यांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण

धारावीत जाण्यासाठी असलेले छोटे रस्ते बहुमजली परंतु छोटी घरे आणि असलेल्या गोदामांमुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी आल्या येथे असलेल्या पत्र्यांच्या घडामोडी आग तोडून अन्य ठिकाणी पसरत होती मात्र असलेल्या अरुंद गल्ल्यांमुळे झोपडपट्ट्यांच्या पत्रांवर उभे राहून अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू झाले नव्याने दाखल झालेल्या एरियल वॉटर व्हेईकल मुळे लांबून पाणी मारणे शक्य झाल्याने काही प्रमाणात जवानांचा धोका कमी झाला असे मांजरेकर यांच्याकडून सांगण्यात आले.