अमरावती पदवीधर मतदारसंघाची दुसऱ्या पसंतीची मतमोजणी संपन्न, महाविकास आघाडी भाजपवर भारी! धीरज लिगांडे विजयी

मरावती पदवीधर (amravati) मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत होती. या निवडणुकीत धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली आहे.

    अमरावती :  राज्यातील पाच पदवीधर-शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या ( teachers graduate constituency election ) मतमोजणीला संपन्न झाली झाली आहे. अमरावती पदवीधर (amravati) मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत होती. या निवडणुकीत धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली  आहे. लिंगाडे यांना एकूण 46 हजार 330 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.

    अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला १,०२,४०३ मतदान झाले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष १९ असे एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून धीरज लिंगाडे व रणजित पाटील यांच्यात चुरस होती. मात्र, प्रत्येक फेरीमध्ये लिंगाडे यांनी आघाडी घेतली. तर, दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र, रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. फेर मतमोजणीतही लिंगाडे आघाडीवर होते. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. अखेर लिंगाडे यांनी  रणजित पाटील यांना पराभूत करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

    भाजपला धक्का

    राज्यातील विधानपरिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात समर्थित उमेदवाराच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, औरंगाबादेत राष्ट्रवादीने आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. तर, कोकण शिक्षकची जागा भाजपने खेचून आणली. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. अमरावतीमध्ये  धीरज लिंगाडे यांनी विजय मिळवला आहे.