पुण्याकडे परतणाऱ्या चित्रकारांच्या गाडीवर दरोडा टाकत लुटले; पोलिसांनी नाकेबंदी करत रचला सापळा, तरीही पळून जाण्याच्या प्रयत्नात तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश, तिघांचा शोध सुरू

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चोवीस तासांत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले. पोलिसांनी चोरट्यांकडून लुटलेला माल, हत्यारे आणि दरोड्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. यातील तीन दरोडेखोरांची ओळख स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पटवली असून तिघेही दरोडेखोर नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

    धुळे : पुण्यातील चित्रकारांना (Pune Painters) लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नांदेड (Nanded) येथील तीन चोरट्यांना हाडाखेड (Hadakhed) येथून वाहन, मोबाईल फोन, रोख रकमेसह अटक (Arrest) केली. अंकुश पवार, सलीम आणि छोटू या अन्य तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे चित्रकार उज्जैनहून पुण्याकडे परतत होते. काल रविवारी रात्री आराम करण्यासाठी ते तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्वी येथे कार पार्क करून झोपले होते. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी कारवर दगडफेक करत चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. पोलिसात एफआयआर दाखल होताच गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी केली.

    दरम्यान, स्विफ्ट कार (एमएच 14 बीएक्स 1573) भरधाव वेगात सेंधवाच्या दिशेने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली, पोलिसांनी नाकाबंदी करून कार अडवली, त्यात संशयित परशुराम राठोड, जगदीश शिवाजी पवार, योगेश शंकर पवार यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून घटनेत वापरलेली कार, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, काडतुसे, दोन मोबाईल फोन, ८,३०० रुपये रोख आणि दोन चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

    शस्त्रे, वाहनांसह तिघे ताब्यात

    स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चोवीस तासांत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले. पोलिसांनी चोरट्यांकडून लुटलेला माल, हत्यारे आणि दरोड्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. यातील तीन दरोडेखोरांची ओळख स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पटवली असून तिघेही दरोडेखोर नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, एएसआय संजय पाटील, अशोक पाटील, संदीप सरग, अमोल जाधव आदींनी दरोड्याची घटना उघडकीस आणली.