बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री सुरु- धुळे पोलिसांनी दुकानमालकावर केली कारवाई, मांजा जप्त

विक्रीवर बंदी घातली असताना देखील धुळे(Dhule) शहरातील पूजा पतंग दुकानाचे मालक पप्पू सिंग परदेशी (Pappu Singh Pardeshi) याने आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवला. नायलॉन मांजाचा साठा त्यांनी आपल्या दुकानात केला.

    धुळे : नाताळ व मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरण्यावर अथवा विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. विक्रीवर बंदी घातली असताना देखील धुळे(Dhule) शहरातील पूजा पतंग दुकानाचे मालक पप्पू सिंग परदेशी (Pappu Singh Pardeshi) याने आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवला. नायलॉन मांजाचा साठा त्यांनी आपल्या दुकानात केला.

    धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ या व्यवसायावर कारवाई केली. यावेळी हजारो रुपये किमतीचा चायनीज नायलॉन मांजा जप्त केला आहे. याबाबत दुकान मालक पप्पूसिंग परदेशी याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत.