म्हसवड येथे माणदेशी फौंडेशनने उभारलेले डायग्नोस्टिक सेंटर

माण तालुक्यात माणदेशी फौंडेशन हे अतिशय चांगले काम करीत असुन आजवर विविध क्षेत्रात त्यांनी अव्वल काम केले आहे, महिला सबलीकरणाबरोबर सामाजिक कार्यातही या फौंडेशनने उत्कृष्ट कार्य केले आहे.

    माण तालुक्यात माणदेशी फौंडेशन हे अतिशय चांगले काम करीत असुन आजवर विविध क्षेत्रात त्यांनी अव्वल काम केले आहे, महिला सबलीकरणाबरोबर सामाजिक कार्यातही या फौंडेशनने उत्कृष्ट कार्य केले आहे. आज म्हसवड याठिकाणी जे आरोग्यासाठी डायग्नोस्टिक सेंटर सुरु केले आहे त्या सेंटर मध्ये त्यांनी दिलेल्या सुविधा ह्या अतिशय दर्जेदार आहेत त्यामुळे हे सेंटर नागरीकांच्या आरोग्यासाठी एक वरदान ठरणार आहेच, या शिवाय या सेंटरमधील मशनरी अन तज्ञ पाहुन जिल्ह्यातील आरोग्य सेंटरसाठी नवा आदर्श निर्माण करणारे ठरणार असल्याचे मत सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केले.

    म्हसवड येथे माणदेशी फौंडेशनने सुरु केलेल्या नवीन डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी नवराष्ट्र शी बोलताना सांगितले की शासन अन जनता यांच्यामधील एक दुवा म्हणुन हे माणदेशी फौंडेशन कार्य करीत आहे याची मी माहिती घेतली असुन यापुढे या फौंडेशनला जी काही शासकीय मदत लागेल ती मी जिल्हाधिकारी या नात्याने पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन, नागरीकांनीही स्वत:च्या आरोग्याची प्रथम काळजी घ्यावी त्यासाठी या सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले.

    यावेळी माणदेशी फौंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा, एक्सचेंजरचे महेश झुराळे, कृष्णा इन्सुट्युटचे सुरेश भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसिलदार सूर्यकांत येवले, विजय सिन्हा, प्रभात सिन्हा आदी प्रमुख उपस्थित होते.