Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....

केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation) पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींवर सुरु असलेली कारवाई हुकूमशाही सारखी आहे. शिवसेनेतील असतील किंवा अन्य पक्षातील असतील जे लोकं परखडपणे बोलतात भूमिका मांडतात, पक्ष वाढीसाठी काम करत असतात अशा लोकांना केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे अशी बोचरी टिका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची यांनी केंद्रातील भाजपावर केली आहे.

    मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. पण सोमवारी आणि मंगळवारी एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी (Rahul Gandhi ED Inquiry) सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तसेच केंद्र सरकार तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करत आंदोलन केले. नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी कार्यालयात राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा (Protest) काढला.

    दरम्यान, या केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation) पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींवर सुरु असलेली कारवाई हुकूमशाही सारखी आहे. शिवसेनेतील असतील किंवा अन्य पक्षातील असतील जे लोकं परखडपणे बोलतात भूमिका मांडतात, पक्ष वाढीसाठी काम करत असतात अशा लोकांना केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे अशी बोचरी टिका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची यांनी केंद्रातील भाजपावर केली आहे.

    मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी ईडी कार्यालयावर (ED Office) धडकल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मुंबईत (Mumbai) काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज पुन्हा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, राजकूय सूड राजकीय बदला, द्वेष या भावनेतून होत आहे. अनिल परबांना (Anil Parab) नोटीस आली आहे. तसेच राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात रात्री १२ वाजेपर्यंत चौकशी करण्यात येत आहे. असे प्रकरण आणखी काही दिवस सुरु राहतील. हुकुमशाहीची सुरुवात आहे असे मानत नाही कारण हे हुकूमशाहीचे टोक आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांना जुलमी पद्धतीने खतम करण्याचे काम हिटलरनेसुद्धा केले नसेल अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकार व भाजपावर  केली. राहुल गांधींची आज सलग पुन्हा तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे.