डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांप्रमाणे शेतकऱ्यांना फटका; तर शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळेना

शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. पूर्वी 300 रुपये रोजी प्रमाणे शेती कामासाठी सहजपणे मजूर मिळत होते. परंतु आता अधिकची मजुरी देऊन सुद्धा शेती कामासाठी वेळेवर मजूर मिळत नाही, मजुरांची कामे यंत्रणांच्या साह्याने करावी म्हटलं तर इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शेती कामे करून घेणे ही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.

    परभणी : मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा आता न परवडणारा व्यवसाय बनला आहे. कधी निर्सगाच लहरी पणा, कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ अश्या अनेक समस्यांचा सामना करणारा वर्ग म्हणजे शेतकरी. आज पुन्हा शेतकरी इंधनाच्या दरात वाढ झाल्याने संकटात आला आहे.

    शेती कामासाठी मजूर मिळेना

    शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. पूर्वी 300 रुपये रोजी प्रमाणे शेती कामासाठी सहजपणे मजूर मिळत होते. परंतु आता अधिकची मजुरी देऊन सुद्धा शेती कामासाठी वेळेवर मजूर मिळत नाही, मजुरांची कामे यंत्रणांच्या साह्याने करावी म्हटलं तर इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शेती कामे करून घेणे ही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.

    इंधनाच्या दरात वाढ झाल्याने चिंतेत

    वर्ष भरापूर्वी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, पाळी, पेरणी ,आदी शेती कामे करून घेतली तर एक हजार ते बाराशे रुपये लागायचे आता इंधनाच्या दरात वाढ झाल्याने दोन ते अडीच हजार लागत असल्याने शेती हा व्यवसाय न परवडणरा झाला आहे अस म्हटलं तर चुकीच ठरणार नाही, वाढत्या महागाईच्या काळात ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा मनुष्यबळ आहे. अश्या शेतकऱ्यांना शेती व्यवसाय हा थोडाफार का होईना फायद्याच आहे.