आमदार जितेंद्र आव्हाडांना ‘ते’ ट्विट भोवणार; अण्णा हजारे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

    अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

    अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?

    माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

    अण्णा हजारे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली. “आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ. हे ज्याने म्हटलं, वाटोळं केलं, त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा लावता येईल का, कुठे-कुठे लावता येईल, कसा लवता येईल याची चौकशी करुन, योग्य तो निर्णय घेऊ”, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.

    जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट काय? 

    आमदार आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका करणारी ट्विट केली होते. यात त्यांनी हजारेंवर निशाणा साधतानाच’या व्यक्तीमुळे देशाचे वाटोळे झालं,टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’ असं म्हणत हल्लाबोल केला होता.