जय भवानी सोसायटी चेअरमनपदी दिलीप भोसले तर व्हाईस चेअरमनपदी हनुमंत भोसले

दौंड तालुक्यातील उंडवडी येथील जय भवानी (Jai Bhavani Society) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप बबनराव भोसले, तर व्हाइस चेअरमनपदी हनमंत किसन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

    यवत : दौंड तालुक्यातील उंडवडी येथील जय भवानी (Jai Bhavani Society) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप बबनराव भोसले, तर व्हाइस चेअरमनपदी हनमंत किसन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात फक्त १३ उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक सर्व सभासदांच्या मदतीने बिनविरोध झाली होती. सोसायटीच्या स्थापनेपासून संस्थापक चेअरमन दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सोसायटी बिनविरोध होण्याची परंपरा सभासदांनी कायम ठेवली आहे.

    संचालक मंडळात विशाल भोसले, सचिन गुंड, दिगंबर गडदे, नामदेव भोसले, सदाशिव यादव, लक्ष्मण कोलते, भरत मदने, उशा भोसले, रतन जगताप, सावित्री निवंगुणे, द्रोपदी कांबळे यांचा समावेश आहे. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक माणिक कांबळे, गंगाधर जगताप उपस्थित होते. तसेच निवडणूक अधिकारी म्हणून पी. व्ही. हराळ यांनी कामकाज पाहिले. सोसायटीचे सचिव गणेश पाडळे व सहसचिव अजय तोडकर यांनी सहकार्य केले.