jaykumar gore

मागील काळात काही अंतर्गत अडचणीमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेज संस्थेत आमदार जयकुमार गोरे यांना भागीदारीत देण्यात आली. मात्र, संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी ॲग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज परतफेड करण्याचं नियोजन झाले होते. तथापि, सन २०१९ पासून आज अखेर आमदार गोरे यांनी संस्थेचा एक रुपयाही कर्जाचा भागविला नाही.

    वडूज : मागील काळात काही अंतर्गत अडचणीमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेज संस्थेत आमदार जयकुमार गोरे यांना भागीदारीत देण्यात आली. मात्र, संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी ॲग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज परतफेड करण्याचं नियोजन झाले होते. तथापि, सन २०१९ पासून आज अखेर आमदार गोरे यांनी संस्थेचा एक रुपयाही कर्जाचा भागविला नाही. उलट काही ना काही अडचणी आणत हे वैद्यकीय महाविद्यालय फुकट बळकावण्यासाठीच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्या विरोधात कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

    या संदर्भात प्रसिद्धीपत्रकात दिलेली माहिती अशी, जयकुमार गोरे यांच्याकडे संस्थेचे असलेली कर्जे भागवण्यासाठी पार्टनरशिप देण्यात आली. मात्र, आज अखेर आमदार गोरे यांनी एक रुपयाही कर्ज भागविले नाही. संस्थेचे विद्यमान खजिनदार व आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांनी मात्र संस्थेविरोधात ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, संस्थेने कोणताही भ्रष्टाचार न केल्याने पळपुटी भूमिका न येता डॉ. एम. आर. देशमुख हे कर नाही तर डर कशाला म्हणून ईडीच्या चौकशीस सामोरे गेले.

    तसेच तेथील चालू असलेले आयुर्वेद महाविद्यालय बंद पडावे व तेथील विद्यार्थी अन्य महाविद्यालयात सामील करून घ्यावे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे आमदारांनी बनावट तक्रार केली.

    तसेच चालू असलेले महाविद्यालय सन 2021-22 साठी आलेली मान्यता सतेचा गैरवापर करून सदर महाविद्यालयाची सन 2021-22 ची मान्यता बनावट तक्रार देऊन आलेले मान्यता नामंजूर करून घेतली. वास्तविक, या संस्थेच्या माध्यमातून आमदारांनी कोरोना काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. मात्र, आमदार गोरे यांच्यावर कारवाई न करता आता ज्यांनी ही संस्था निर्माण केली. त्यांच्यावरच कारवाई करून काय साधले याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.