
नऊ वर्षांपासून कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. ते थेट पाईपलाईनचे पाणी अखेर कोल्हापुरात दाखल झाले. आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासियांचे कित्येक वर्षाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला येताच कोल्हापुरात दिवाळी साजरी झाली. पाणी आल्याने यंदाच्या दिवाळीत थेट पाईपलाईंनच्या पाण्याने अभ्यंगस्नान होणार आहे.
कोल्हापूर : नऊ वर्षांपासून कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. ते थेट पाईपलाईनचे पाणी अखेर कोल्हापुरात दाखल झाले. आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासियांचे कित्येक वर्षाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला येताच कोल्हापुरात दिवाळी साजरी झाली. पाणी आल्याने यंदाच्या दिवाळीत थेट पाईपलाईंनच्या पाण्याने अभ्यंगस्नान होणार आहे.
कोल्हापूर शहराला पुरेसा, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातुन थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला होता. गेली आठ, नऊ वर्ष या योजनेचे काम सुरू होते. त्यामध्ये अनेक अडथळे आले होते.
गेल्या दोन वर्षांपासून थेट पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोणत्याही परिस्थितीत दिवाळीला अभ्यंग स्नान घालण्याची घोषणा नेत्यांनी केली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पाणी येऊ शकले नव्हते. मात्र आज रात्री अकरा वाजता थेट पाईपलाईनचे पाणी पुई खडीत आले. याची माहिती कोल्हापूर शहरात पसरल्यानंतर दिवाळी साजरी करण्यात आली.
आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून नववर्षांनी त्यांची स्वप्नपूर्ती झाली. त्याची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील यांनी रात्री अकरा वाजता पुईखडी पंपिंग स्टेशनला भेट देऊन आनंद उत्सव साजरा केला.
आमदार पाटील यांना याचा इतका आनंद झाला की त्यांनी थेट दिवाळीपूर्वी पहिली आंघोळ थेट पाईपलाईनच्या पाण्याने केली. शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नपूर्ती झाल्याने त्यांना गुलालानेचं नाहून काढले. यावेळी आमदार ऋतुराज आणि जयश्री जाधव उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडीच्या पाण्याचं विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर हलगीच्या ठेक्यावर आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सर्वानीच जल्लोष साजरा केला.
देवीच्या चरणी वाजत गाजत थेटपाईप लाईनचे पाणी कोल्हापूर शहरात पाईपलाईन येतात त्यांचा आनंद सर्व कोल्हापूरवासियांना होता. सुवासिनींनी हे पाणी कलशामध्ये भरून, करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण केले. कोल्हापूरकरांना कायमस्वरूपी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळवून दिल्याचा आनंद आणि आत्मिक समाधान मिळालं. या योजनेसाठी अनेक अडचणी आणि संकंटांवर मात करत केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्याला यश मिळालंय. त्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान लाभत असून, हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.