disciplinary action case update high court challenge by gunaratna sadavarte to suspend charter court refuses to hear plea however the petition is allowed to be amended nrvb

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (ST Workers Agitation) सदावर्ते यांनी माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केली. त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा आरोप करून पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे अध्यक्ष सुशील मंचेकर (Sushil Manchekar) यांनी सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडे तक्रार केली होती.

मयुर फडके, मुंबई : वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन (Violation of Code of Conduct of Advocates) केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांची सनद दोन वर्षांच्या कालावधीसाठी (Two Years) निलंबित करण्यात आली आहे (Has Been Suspended). महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या या निर्णयाला सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान (Challenge In High Court) दिले आहे. मात्र, न्यायालयाने सदावर्तेंची बाजू ऐकण्यास बुधवारी नकार दिला. मात्र, त्यांना याचिकेत दुरूस्ती करण्याची मात्र मुभा दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (ST Workers Agitation) सदावर्ते यांनी माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केली. त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा आरोप करून पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे अध्यक्ष सुशील मंचेकर (Sushil Manchekar) यांनी सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडे तक्रार केली होती. त्यावर परिषदेच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांना वकील कायद्याच्या कलम ३५ नुसार, गैरवर्तणुकीप्रकरणी दोषी ठरवले. तसेच दोन वर्षांसाठी त्यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सदावर्ते यांना आदेशाची प्रत मिळाल्याच्या दिवसापासून आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला होता. तसेच तक्रारीवर कारवाई करताना सदावर्ते यांनी वैयक्तिक सुनावणी देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसारच समितीने सदावर्ते यांना शिस्तभंगाच्या कारवाईत दोषी ठरवले आहे.

त्या निर्णयाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्या.गौतम पटेल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वकील नियुक्त केला असताना सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद कऱण्यास सुरुवात केल्यामुळे न्यायालयाने त्यांना रोखले आणि त्यांची बाजू ऐकण्यास नकार दिला तसेच आधीच दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्यास मुभा देऊन याचिकेवरील सुनावणी १७ एप्रिल रोजी ठेवली.