निधी वाटपातील भेदभाव गंभीर, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी; नाना पटोले यांची मागणी

निधी वाटपाबाबत समाजात चूकीचा संदेश जात आहे, तसंच असे प्रश्न भविष्यात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. 

  भंडारा : निधी वाटपाबाबत समाजात चूकीचा संदेश जात आहे, तसंच असे प्रश्न भविष्यात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

  दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देत असल्याची तक्रार शिवसेना आमदारांनी केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी आमदारांवर अन्याय होत आहे त्या कामांना स्थागिती देण्याची भूमिका घेतली आहे.

  मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयावरुन पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. निधी वाटपावरुन भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून, ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणं गरजेचं आहे. काँग्रेसनेही निधी वाटपात भेदभाव होण्याच्या तक्रारी अनेक वेळा केली आहे. या गोष्टींमुळे समाजात चूकीचा संदेश जात असल्याने तसंच हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी अशी मागणी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  नेमकं काय आहे प्रकरण? 

  विकास निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातं आहे. शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदार संघात विकासकांना निधी दिला जात असल्याची तक्रार शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा कामांना स्थगिती देत निधी वाटपाबाबत होत असलेला अन्यायाचा लेखाजोखा तयार करण्याचे काम समन्वयक म्हणून आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे दिले आहे.

  तसंच ‘आम्ही आमदार आहोत म्हणून तुम्ही मंत्री आहात, मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, विकास निधीचे समान वाटप झाले पाहिजे, आम्हाला डावलने आम्ही सहन करणार नसल्याचं देखील आमदार आशिष जयस्वाल म्हणाले आहेत.