वेषांतर करून पोलिसांची धडक कारवाई ; १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एकास अटक

विंग तालुका खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज वॉशिंग मशीन, असे साहित्य कर्नाटक राज्यातील विजापूर येथील लमान तांड्यावर परस्पर विकणाऱ्या कंटेनर चालकाला शिरवळ पोलिसांनी वेशांतर करून अटक केली आहे. अशोक वेणू चव्हाण (वय ४१), राहणार बेगम तालाव, तांडा, जलनगर तालुका जिल्हा विजापूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कंटेनरसह ५८ फ्रिज व ५६ वॉशिंग मशीन असा १४ लाख ४५ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  शिरवळ : विंग तालुका खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज वॉशिंग मशीन, असे साहित्य कर्नाटक राज्यातील विजापूर येथील लमान तांड्यावर परस्पर विकणाऱ्या कंटेनर चालकाला शिरवळ पोलिसांनी वेशांतर करून अटक केली आहे. अशोक वेणू चव्हाण (वय ४१), राहणार बेगम तालाव, तांडा, जलनगर तालुका जिल्हा विजापूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कंटेनरसह ५८ फ्रिज व ५६ वॉशिंग मशीन असा १४ लाख ४५ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद
  याबाबतचे अधिक माहिती अशी की, विंग तालुका खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे वॉशिंग मशीन फ्रीज कंटेनर कंटेनरमध्ये लोड करून भिवंडी येथील गोडाऊनमध्ये पोहोच करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र कंटेनर चालक अशोक चव्हाण यांनीही गाडी गोडाऊनला पोहोचवली नाही, म्हणून कंटेनर चालक अशोक चव्हाण (वय ४१) राहणार बेगम तालाब, तांडा, जलनगर, तालुका जिल्हा विजापूर याच्या मोबाईलवर गोडाऊन मॅनेजरने फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. तसेच गाडीची जीपीएस यंत्रणा बंद होती. त्यामुळे कंटेनर चालक चव्हाण यांनी ट्रान्सपोर्टचा माल कंटेनरसह गायब केल्याचा संशय बाळावला होता त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली होती.

  या घटनेचे गांभीरे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेप्रमाणे शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बारेला, अजित बोराटे, तुषार अभंग या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पथकाने विजापूर कर्नाटक पेठ नाका कोल्हापूर तासवडे टोल नाका तसेच विजापूर परिसरातील जास्तीत जास्त लमाणतांडे पालथे घातले गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचे फ्रिज आणि वॉशिंग मशीन चव्हाण याने विजापूर जिल्ह्यातील लमाण तांड्यामध्ये विविध ठिकाणी विकल्याचे स्पष्ट झाले.

  -कामगिरी लक्षवेधक ठरली
  शिरवळ पोलिसांच्या पथकाने विजापूर येथून चव्हाण याला शिताफीने अटक करून त्याच्याकडील वॉशिंग मशीन फ्रीज व कंटेनर असा १४ लाख ४५ रुपये किमतीचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. या कारवाईमध्ये शिरवळ पोलिसांनी आरोपीला संशय येऊ नये म्हणून वेषांतर करून केल्याने ही कामगिरी लक्षवेधक ठरली आहे. शिरवळ पोलिसांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.