अनधिकृत बांधकामाना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा : एमसीएचआय संघटनेची मागणी

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज भागवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरण देण्यात यावे अशी मागणी केल्याचे देखील यावेळी एमसीएच्या संघटनेचे पदाधिकारी रवी पाटील यांनी सांगितले.

    अनधिकृत बांधकामाना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी एमसीएचआय या बिल्डर संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होतात. त्या ठिकाणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

    कल्याण डोंबिवलीतील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज भागवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरण देण्यात यावे अशी मागणी केल्याचे देखील यावेळी एमसीएच्या संघटनेचे पदाधिकारी रवी पाटील यांनी सांगितले. एमसीएचआय तर्फे एमसीएचआय तर्फे 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान कल्याणच्या फडके मैदानात प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुष्याच्या अनधिकृत बांधकामाविरोधात देखील संघटना कार्यरत असल्याची माहिती दिली. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.