संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात होऊन 20 वर्षीय मित्राने 35 वर्षीय मित्राच्या उजव्या बाजूला हनुवटीवर हत्याराने वार केले. यात 35 वर्षीय मित्राचा दुर्दैवी मृत्यू (Murder in Chandwad) झाला. या घटनेबाबत विजय त्र्यंबक पगार (वय 42) यांनी वडनेरभैरव पोलिसात माहिती दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

    चांदवड : दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात होऊन 20 वर्षीय मित्राने 35 वर्षीय मित्राच्या उजव्या बाजूला हनुवटीवर हत्याराने वार केले. यात 35 वर्षीय मित्राचा दुर्दैवी मृत्यू (Murder in Chandwad) झाला. या घटनेबाबत विजय त्र्यंबक पगार (वय 42) यांनी वडनेरभैरव पोलिसात माहिती दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

    फिर्यादी विजय पगार यांच्याकडे महेशभाई उर्फ अज्जू रमेशभाई बंजारा (२०, गौत्री, वडोदरा, गुजरात) व राजू (३५, पूर्ण नाव, गाव माहिती नाही) हे दोघे शेती कामाला होते. 12 ऑगस्टला सायंकाळी साडेसातच्या सुमारास महेशभाई उर्फ अज्जू व राजू यांच्यात पैशाच्या कारणावरून शेवग्याच्या मळ्यातील पत्र्यांच्या शेडमध्ये पैशांवरून वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या हाणामारीत अज्जू याने एका हत्याराने राजूच्या उजव्या बाजूच्या हनुवटीवर वार केला. या हल्ल्यात राजू रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. यातच तो गतप्राण झाला.

    या घटनेची माहिती विजय पगार यांनी वडनेरभैरव पोलिसांना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. यावेळी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीस चांदवड न्यायालयात नेले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.