buldhana apmc news

बुलढाणा (Buldhana) बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. प्राथमिक माहितीनुसार यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.

    बुलढाणा : आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटातील वादाने आता जहाल संघर्षांचे (Dispute Between Shivsena And Shinde Group) रूप धारण केले आहे. आज बुलढाणा (Buldhana) बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. (Buldhana APMC) यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.

    विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते,असा थेट आरोप केला. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. संजय हाडे यांच्या पोटात लाथ घालण्यात आली तर छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिकांनी पोबारा केला.