
कॉंग्रेसचे मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावर तलवार हातात घेतली म्हणून मुंबई पोलीसांनी गुन्हे थेट दाखल केले. याच मु्द्द्यावर काँग्रेसचे नेते आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह काही मंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. ‘सरकार आपले तरी मुंबई पोलीस आपल्याच मंत्र्यांवर गुन्हे दाखल करतात.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस मंत्र्यांवर मुंबई पोलीसांनी गुन्हे दाखल केले या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना रोषाला सामोरे जावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनीही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात जाहीरपणे पुरावे दिल्यानंतर पोलीसांकडून कारवाई होत नसल्याबाबत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि शिवसेना मंत्र्यांनी वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
तलवार घेतली म्हणून मुंबई पोलीसांचे पालकमंत्र्यावरच गुन्हे
कॉंग्रेसचे मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावर तलवार हातात घेतली म्हणून मुंबई पोलीसांनी गुन्हे थेट दाखल केले. याच मु्द्द्यावर काँग्रेसचे नेते आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह काही मंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. ‘सरकार आपले तरी मुंबई पोलीस आपल्याच मंत्र्यांवर गुन्हे दाखल करतात. शेख स्वत: मुंबईचे पालकमंत्री आहेत मात्र त्यांचा जराही विचार न करता कारवाई होते असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे.
पुरावे दिल्यानंतर साधी चौकशीची नोटीसही नाही
याच वेळी शिवसेना मंत्र्यानी संजय राऊत यांनी जाहीरपणे भाजपच्या नेत्यांच्या विरोधात पुरावे दिल्याचे सांगितल्यानंतरही मुंबई पोलीसांनी साधी चौकशीची नोटीसही काढली नाही त्यामुळे आता भाजपकडून हिणवले जात असल्याचा मुद्दा काढण्यात आला. या विषयावर मुख्यमंत्र्यासमोर गृहमंत्री आणि दोन्ही पक्षांच्या मंत्र््यांची शाब्दिक चकमक झाल्याची माहिती या सूत्रांनी दिली. त्यावेळी मुख्य सचिवांच्या समिती मार्फत याबाबत अहवाल मागवून गुन्हे दाखल कोणत्या कारणांमुळे केले यांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच प्रलंबित कोणती प्रकरणे आहेत त्याचा आढावा देखील घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यामुळे सत्तेतील दोन्ही घटकपक्षांच्या मंत्र्यानी वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे या सूत्रांनी सांगितले.