शाम मानव आणि बागेश्वर महाराज यांच्यात रंगला वाद, आता नागपूरात शाम मानव यांच्या विरोधात आंदोलन; वाचा काय म्हणाले शाम मानव ?

बागेश्वर बाबा आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाख रुपये घेऊन जा, असे आव्हान श्याम मानव यांनी दिले आहे. म मानव यांनी दिलेले आव्हान बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले आहे. मी चमत्कार सिद्ध करून दाखविण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या. आम्ही सर्व काही उघड करू. बंद दरवाजाआड काही करणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.

    नागपूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी बागेश्वरचे पिठाधिश धीरण कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात ‘ते ठग आहेत आणि म्हणुनच आव्हान न स्विकारता त्यांनी नागपूर मधुन पळ काढला’ अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. मात्र, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांचे समाधान करू तुम्ही फक्त रायपूरच्या रामकथेत या असे निमंत्रण शास्त्री महाराज यांनी दिले होते. आम्ही कुठे ही जाणार नाही तुम्ही नागपूरला येऊन खरं की खोट हे स्पष्ट करावं अशी भुमिका श्याम मानव यांनी घेतल्याने आता सनातन धर्मीय श्याम मानव यांच्या विरोधात एकत्रित आले आहे. आज नागपुरच्या संविधान चौकात सनातन धर्माचे साधू महाराज आणि बागेश्वर सरकार यांच्या समर्थकांनी शाम मानव यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

    काय आहे प्रकरण ?
    मी इतरांच्या मनातील ओळखतो ही माझ्या गुरुची कृपा आहे. सनातनच्या मंत्राची ताकद आहे, असा दावा करणारे बागेश्वर बाबा यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. बागेश्वर बाबा आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाख रुपये घेऊन जा, असे आव्हान श्याम मानव यांनी दिले आहे. म मानव यांनी दिलेले आव्हान बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले आहे. मी चमत्कार सिद्ध करून दाखविण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या. आम्ही सर्व काही उघड करू. बंद दरवाजाआड काही करणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. पण, श्याम मानव यांनी हे प्रतिआव्हान नाकारले आहे. रायपूरला तुमची माणसे, तुमचा मंच असेल. आव्हान नागपुरात पूर्ण होईल. दहा लोकांच्या उपस्थितीत आपण निर्णय करू असे ते म्हणाले आहेत.