जमीन दाखवणाऱ्यांना आसमान दाखवणार; महिन्याभरात निवडणुका घेऊन दाखवाच! उद्धव ठाकरेंचं BJP ला खुलं आव्हान

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे गटप्रमुखांना (Gatpramukh) संबोधित करताना भाजप, शिंदे गट, मोदी-शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. दसरा मेळाव्यावरुन सुद्धा एकनाथ शिंदेवर चांगलीच टिका केली. शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याआधीच आज शिवसेनेची तोफ धडाडली आहे. 

  मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर (Shinde Group) शिवसेनेला गळती लागली असून, पदाधिकारी, नगरसेवक तसेच खासदारांनी (corporators and MP) सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर शिंदे गट व शिवसेना (Shivsena and shinde group) अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान आता शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावरुन सुद्धा शिंदे गट व शिवसेनेत तू….तू, मै…मै चालले आहे, तसेच हा प्रश्न कोर्टापर्यंत पोहचला आहे, त्यामुळं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव कोण घेणार? याची उत्सुकता असताना, आज दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेचा गटप्रमुखांचा एक मोठा मेळावा गोरेगावमधील नेस्को संकुलात पार पडला. दरम्यान, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे गटप्रमुखांना (Gatpramukh) संबोधित करताना भाजप, शिंदे गट, मोदी-शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. दसरा मेळाव्यावरुन सुद्धा एकनाथ शिंदेवर चांगलीच टिका केली. शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याआधीच आज शिवसेनेची तोफ धडाडली आहे.

  आदिलशहा, निजामशहा, त्याच कुळातले अमित शहा

  दरम्यान, सगळे मिंधे शिंदे गटात गेलेत, बाप पळवणारी टोळी सध्या राज्यात फिरतेय. शिवसेनेच्या दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात आदिलशहा, निजामशहा आले, त्याच कुळातले अमित शहा आहेत. मुंबई तुमच्यासाठी विकण्याची जमीन, पण आमच्यासाठी मातृभूमी आहे. आईला गिळायला निघालेले लोकं महाराष्ट्रात आहेत, याचं दुदैव आहे. मुंबईपासून 232 किलोमीटर लांब जावं लागलं होतं. ढोकळा ख्यायला सुरतला गेला, आमचा ठेचा काय तिखट लागला का, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. तुमच्यामुळं मी उभा आहे.

  25 वर्ष आम्ही या नालायकांना पोसलं 

  वंशवादावरुन टिका करणाऱ्यांनी स्वताचे वंश पाहावा, बावनकुळे आहेत की 152 कुळे आहेत, हेच समजत नाही. शिवसेनेनं 25 वर्ष मुंबईची सेवा केली. शिवसेना म्हटलं की विकास आहे. मुंबईत जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक धावून जातात. चित्ते डरकाळी फोडत नाहीत, म्याव म्याव करतायेत. 25 वर्ष युतीत आमची सडली. तसेच 25 वर्ष आम्ही नालायक लोकांना पोसलं अशी बोचरी टिका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

  मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला नेलं

  धारावीत आर्थिक केंद्र झालं पाहिजे. वेदांता गेल्यावर धादांत खोटं बोलतात. महाराष्ट्रातून उद्योग जात आहेत. पण उद्योगमंत्र्याचं लक्ष आहे का, मिंदे गट दिल्लीत मुजरा करायला गेले. राज्यातून उद्योग जात आहेत, गुजरातला मात्र केंद्र सवलती देत आहे. शिवसैनिकांसारखी भाजपाने कधी मदत केली का, असा सवाल सुद्धा ठाकरेंनी विचारला. मुंबईला गुलाम करायचे आणि दिल्लीश्वरांच्या चरणी वाहयचे आहे का. मुंबई कोणासमोर झुकणार नाही.

  …तर आम्ही तो गुन्हा केला का?

  कोविडकाळात मविआ सरकारने केलेल्या कामाचे सर्वंत्र कौतूक झाले. मात्र विरोधक हे विरोधासाठी टिका करत आहेत. दरम्यान, कोरोनाकाळात आम्ही जर लोकांचे प्राण वाचवण्याचे गुन्हा केला तर तो आम्ही वारंवार करणार. लोकांच्या काळजीसाठी आम्ही सर्व धर्मावर निर्बंध लादले. पण लोकांचे जीव वाचविले. गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देणार नाही. कोरोनाकाळात जे यूपीत घडलं ते महाराष्ट्रात घडलं नाही. आरोग्यसुविधा फक्त मुंबईत चांगल्या होत्या.

  मग जाहिरातीवर एवढा खर्च का?

  पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचं सरकार येण्याआधी वारीला आम्ही परवानगी दिली. हळूहळू निर्बंध आम्ही खुले केले. कोरोनाकाळात भ्रष्टाचाराचा आरोप हा चुकीचा आहे, भाजापाने मुंबईत वारेमाप जाहिरातीवर खर्च केला आहे.

  भाजपाकडे वॉशिंग मशीन

  लोकशाही जिंवत आहे, कोर्टाचे निकाल ठरले आहेत. वाटा खोके आणि करा सरकार कशाला हव्यात निवडणुका, दुसऱ्या पक्षात असणारा भाजपात गेला की तो पवित्र होतो, भाजपाकडे स्वच्छ करायचे वॉशिंग मशीन आहे, अशी टिका सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.

  अमित शहांना आव्हान

  दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजप व अमित शहांना आव्हान दिलंय की, तुमचे कोणतेही डावपेच चालणार नाही, आणि मुंबईला शिवसेनेपासून वेगळे होऊ देणार नाही, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शहांना दिलं. तसेच मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही, हिंदूमध्ये फूट पडू देणार नाही.