मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

    वडूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

    खटाव तालुक्यातील वरुड येथील शिवाजी नगर,वाकेश्वर,नायकाची वाडी या तीन गावांत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 300 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. तर उर्वरित गावांतील प्राथमिक शाळेत ही साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी सांगितले.यावेळी नवनाथ जाधव,धनंजय क्षीरसागर, माजी सरपंच लालासो माने,दादासाहेब सूर्यवंशी, सूरज भांडवलकर, काळे, जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल गोडसे,अमित पंडित, मनसुर शेख, मनोज माने ,आदित्य लोहार, मंगेश पवार, महेश देसाई, विशाल लोहार आदी मनसेसैनिकांनी परिश्रम घेतले.