पंढरपूर तालुक्यात उद्यापासून आनंदाचा शिधा वाटप; तब्बल ‘इतक्या’ कुटुंबांना मिळणार लाभ

पंढरपूर तालुक्यातील ९५ गावांमध्ये एकूण १४६ रेशन धान्य दुकाने आहेत. त्यामध्ये ४० हजार ६९६ कुटुंबांना आनंदाचा शिधा सोमवार (दि. ६ नोव्हेंबर २०२३) रोजी पासून प्रत्यक्ष वितरण होणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा  वस्तूंचा समावेश आहे.

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील ९५ गावांमध्ये एकूण १४६ रेशन धान्य दुकाने आहेत. त्यामध्ये ४० हजार ६९६ कुटुंबांना आनंदाचा शिधा सोमवार (दि. ६ नोव्हेंबर २०२३) रोजी पासून प्रत्यक्ष वितरण होणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा  वस्तूंचा समावेश आहे. त्या शासकीय धान्य गोदाम पंढरपूरमध्ये प्राप्त झाल्या आहेत. शासकीय धान्य गोदामामधून रेशन धान्य दुकानांना वितरण चालू असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
    गतवर्षी ‘आनंदाचा शिधा’ या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची म्हणजेच मैदा आणि पोहा यांची भर पडली आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा वस्तू शिधा जिन्नस समाविष्ट  असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा प्रतिसंच १०० रुपये दरात ई- पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. हा शिधा तालुक्यातील ४० हजार ६९६ इतक्या पात्र कार्डधारकांना सवलतीच्या दरात दिपावली सणा अगोदर म्हणजेच सोमवारपासून वाटप केला जाणार आहे.
    योग्य पद्धतीने वाटप होणार
    पंढरपूर  तालुक्यातील १४६ रास्त भाव धान्य दुकानदारांकडून मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना योग्य पध्दतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. याबबात पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.