महिलांना भाजीपाला बियाण्यांचे वाटप; कृषी विभागाचा उपक्रम

महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या आत्मा अंतर्गत पौष्टिक आहार योजनेअंतर्गत अमोल मोरे यांनी महिला शेतकरी बचत गटातील महिलांना दहा प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप केले.

    जुन्नर : खटकाळे (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या आत्मा अंतर्गत पौष्टिक आहार योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय जाधव व कृषी पर्यवेक्षक बापूसाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक अमोल मोरे यांनी महिला शेतकरी बचत गटातील महिलांना दहा प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप केले.

    यावेळी सरपंच शकुंतला मोरे, उपसरपंच भरत मोडक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे तसेच शेतकरी मित्र विलास मोरे, शेतकरी बचत गटाच्या महिला अध्यक्ष लताबाई केदारी आणि गटातील सर्व शेतकरी महिला उपस्थित होत्या.

    फलोत्पादन अभियानाची माहिती

    तसेच एकात्मिक फलोत्पादन अभियान या योजनेची महिला शेतकरी बचत गट यांना माहिती देण्यात आली. तसेच शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ, पॉली हाऊस, ग्रीन नेट याबद्दल माहिती देण्यात आली‌. महिलांना आपल्या परसबागेमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करून घरच्या घरी ताजा व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या ताज्या भाजीपाल्यामुळे महिलांची रोजच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.