
साखळी उपोषणाच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत .
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे : मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. म्हणून जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा दिला जात आहे. कल्याण मध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणाच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत .
तात्काळ आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर ते पूर्ण करतीलच. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार आहे असे अरविंद मोरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शांततेत उपोषण सुरू आहे साखळी उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस दिली आहे. मराठा मुख्यमंत्री असताना जर पोलीस मराठ्यांना नोटीस दिली जात असेल तर मराठा मुख्यमंत्री नको अशी आक्रमक भूमिका मांडली अरविंद मोरे यांनी मांडली आहे.