राहुल गांधीच्या ईडी चौकशी विरोधात नंदुरबारमध्ये जिल्हा काँग्रेसचं आंदोलन

द्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्व सामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकारातून घटनेची पायमल्ली करीत आहे. या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेसने विरोध केला.

    नंदुरबार : काँग्रेस राहुल गांधी यांची सध्या या ईडी चौकशी सुरू आहे. या चौकशीचा देशभरातून विरोध होताना दिसतोय. १३ जुन २०२२ पासून सुरु करण्यात आलेली त्यांची चौकशी सतत तीन दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलावण्यासह काँग्रेसच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलीसांकडून घेराव घालणे, पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अकारण पोलिसांकडून मारहाण होणे व त्यांना डांबून ठेवणे असे प्रकार घडले आहेत. या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

    केंद्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्व सामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकारातून घटनेची पायमल्ली करीत आहे. या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेसने विरोध केला.