पालखीमुळे दिवेघाट व बोपदेव घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि.२४) सासवड मुक्कामी येत असल्याने वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दिवे घाटातील (Dive Ghat) वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बोपदेव घाट (Bopdev Ghat) देखील वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

    सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि.२४) सासवड मुक्कामी येत असल्याने वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दिवे घाटातील (Dive Ghat) वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बोपदेव घाट (Bopdev Ghat) देखील वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

    या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी नारायणपूरमार्गे पुणे-सातारा महामार्गाचा वापर करावा व जेजुरी येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक शिंदवणे घाटातून लोणी काळभोर या मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते यांनी दिली.

    माउलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्हा अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार या सोहळ्यात ४ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी, २० पोलिस निरीक्षक, ५० पोलिस उपनिरीक्षक, १ हजार पोलिस जवान तैनात करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई करण्यात येईल.