दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा; मुंबईसह ‘या’ १०० ठिकाणी कांदा फक्त २५ रुपये किलो

मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात प्रत्येकाची दिवाळी चांगली जावी यासाठी नाफेडकडून कमी किंमतीत कांदा विक्री सुरू आहे.

  मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये नाफेडकडून कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात प्रत्येकाची दिवाळी चांगली जावी यासाठी नाफेडकडून कमी किंमतीत कांदा विक्री सुरू आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे हा रास्त दरातील कांदा विक्री करण्यात येत आहे.
  कांदा फक्त २५ रुपये किलो
  नागरिकांना सवलतीमध्ये कांदा मिळावा यासाठी नाफेडकडून वेगळे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे तुम्ही एक ते दोन किलो कांदा देखील खरेदी करू शकता. या कांद्याची किंमत नाफेडकडून २५ रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
  १०० ठिकाणी विक्री केंद्र
  नाफेडकडून नागरिकांसाठी एकूण १०० ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात आलीत. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई आणि पनवेलमध्ये केंद्र उभारण्यात येत आहेत. मोबाइल व्हॅनमार्फत रास्त दरात कांदा विक्री होणार असल्याची माहिती मिळालीये.
  २५ विक्री केंद्रे
  सद्यस्थितीमध्ये २५ विक्री केंद्रे उभारण्यात आलीत. त्यामार्फत नागरिकांपर्यंत स्वस्त:त कांदा पोहचवला जातोय. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करताना दिसते. मात्र नागरिकांसाठी भारत चनाडाळ, भारत आटा आणि कांदा विक्रीसारखी केंद्र सुरू केल्याने सामान्यांना दिलासा मिळतोय.